Talegaon : शिरगावच्या रमेश फरताडे यांना राज्यस्तरीय कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा राज्यस्तरीय कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार मावळ विभागातून शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश जगन्नाथ फरताडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण पंढरपूर येथे विधान परिषदेचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर धावणे, अमोल बोरकर, सचिव संतोष काळे, बद्रीनारायण पाटील, मछिंद्र कापरे, राधेशाम वारे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या चालू करून त्यांना शिक्षणाच्या प्रवासात आणले. शिक्षणामध्ये विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले असून विनाअनुदान तत्वावर कार्यरत असून देखील त्यांच्या कार्याने त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.  त्यांच्या प्रयत्नातून शिरगाव येथे जवळपासच्या परिसरातील मुला मुलींसाठी ज्युनिअर कॉलेज सुरु करण्यात आले.

ग्रामीण भागातील वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिक्षकांना मार्गदर्शन, दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे नियोजन व सर्वांना एकत्र करून काम करण्याची वृत्ती असल्याने विद्यार्थीप्रिय शिक्षकांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे,  सचिव सपना लालचंदानी, जयेश मुळे, अनिल देवकर,संतोष मुऱ्हे, मोहन अरगडे, मुख्याध्यापक  विजय लोखंडे, संतोष चव्हाण आदींसह सर्व शिक्षक व सहकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.