Chinchwad News : संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी रॅम्प  

एमपीसी न्यूज – चिंचवड एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या चिंचवडगावात उतरणा-या रॅम्पमुळे नागरिकांचे 1.5  किलोमीटर अंतर वाचणार आहे.  त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत देखील होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी दोन्ही बाजूस रॅम्प बांधण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, शीतल शिंदे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे, कोमल मेवानी, स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, रवींद्र सूर्यवंशी, सुनील पवार, अशोक कुटे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, या रॅम्पबाबत नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने या रॅम्पचा शुभारंभ होत आहे. या रॅम्पचा उपयोग चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी तसेच नागरिकांना होणार आहे. या भागालगतची वाहतूक निश्चितच सुरळीत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.