Lonavala : शहर भाजपच्या अध्यक्षपदी रामविलास खंडेलवाल

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी लोणावळा मंडलच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक रामविलास खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली. 

भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नियुक्त प्रभारी अँड रवींद्र दाभाडे यांनी खंडेलवाल यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मंडल अध्यक्ष श्रीधर पुजारी, अरविंद कुलकर्णी, सचिव समिर इंगळे, गटनेते देवीदास कडू, नगरसेवक राजाभाऊ खळदकर, भरत हारपुडे, मंदा सोनावणे, ब्रिंदा गणात्रा, बाळासाहेब जाधव, सुरेश गायकवाड, मावळ तालुका युवा कार्याध्यक्ष अरुण लाड, नविन भुरट, नंदू जोशी, हर्षल होगले, सुनिल तावरे, संतोष गुप्ता, राजू परदेशी, देवा दाभाडे, चंद्रकांत फडके, व्यापारी आघाडी अध्यक्ष गिरीष मुथा, ललित सिसोदिया, अनिल गायकवाड, जितेंद्र ललवाणी, प्रदीप थत्ते,  विजय सिनकर, दीपक कांबळे, निखिल सोमण, महिला अध्यक्षा योगिता कोकरे, चारुलता कमलवार, श्रेया रहाळकर, विजया मराठे, परिजा भिलारे, मृदुला पाटील, प्रिया देसाई,  शारदा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लोणावळा शहरात भाजप पक्षाची संघटना बांधणी करण्याचा मनोदय यावेळी खंडेलवाल यांनी व्यक्त केला.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.