Pune : ग.दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी रंगकर्मींचे घंटानाद आंदोलन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ साहित्यिक ग, दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी रंगकर्मी आणि रसिकांनी बालगंधर्व रंगमंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले.

गदिमा यांचे एक ऑक्टोबरला जन्म शताब्दी वर्ष सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मारकाची घोषणा करून लवकरात लवकर स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी साहित्यप्रेमी, रंगकर्मी, रसिक आंदोलकांनी केली.

गेल्या 41 वर्षात गदिमांचे स्मारक न होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच स्मारक न झाल्यास अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.