Lonavala News : कुसगाव बुद्रुकमध्ये आढळले रानगवे

एमपीसी न्यूज : लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक गावात दोन रानगवे एकत्र मिळून आले. त्यांना त्यांच्या रहिवासात सोडण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. कुसगाव बुद्रुक डोंगराच्या जवळच शिवाजी गाडे यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्याजवळ हे दोन मोठे रानगवे आढळले. दुपारी गुरे तिथेच विश्रांतीसाठी असतात. नंतर पुन्हा चरण्यासाठी रानात सोडतात.

बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास देवशंकर गाडे व गुरे सांभाळणारा मुलगा लक्ष्मण यांनी गुरे चरायला सोडली व शेताच्या आजूबाजूला फेरी मारून पुन्हा ते दोघे गुरांजवळ गेले तर त्यांच्या निदर्शनास दोन रानगवे आले. त्यांनी तात्काळ शिवाजी गाडे यांस संपर्क साधून वनविभागास माहिती देण्यास सांगितली.

शिवाजी गाडे, देवशंकर गाडे, हनुमंत साबळे, शंभु गाडे, सार्थक गाडे, सक्षम गाडे यांनी त्या रानगव्यास मानवी वस्ती पासून दूर, कसलाही त्रास न देता सुखरूप जंगलात पोहचवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.