Pimpri News: पिंपरीगावातील रंगुबाई कुदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील रंगुबाई निवृत्ती कुदळे यांचे अल्पशा आजाराने आज (मंगळवारी) निधन झाले. त्यांचे वय 75 होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली असा परिवार आहे.

रंगुबाई कुदळे या सावता सेवक मंडळात गेली 40 वर्ष सक्रिय होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे यांच्या त्या मातोश्री होत.

रंगुबाई कुदळे यांच्या पार्थिवावर  पिंपरीगावतील स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.