BNR-HDR-TOP-Mobile

Ranjangaon : शिवशाही बसला रांजणगाव येथे अपघात ; 15 प्रवासी जखमी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुण्याहुन-औरंगाबादला जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात होऊन चालकासह 15 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 14) रात्री पुणे -नगर रस्त्यावर रांजणगाव येथे घडला. चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. त्यानंतर 108 या रुग्णवाहिकेतून सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

.

HB_POST_END_FTR-A1
.