Pune : राव, परेरा, गोन्साल्विस, भारद्वाज आणि नवलाखा यांना नजरकैद

एमपीसी न्यूज – राव, परेरा, गोन्साल्विस, भारद्वाज आणि नवलाखा यांना अटक केलेल्या पाचही आरोपींना पुढील सुनावणी होईपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला येत्या गुरुवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. 

बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी काल मंगळवारी (दि.28) वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना अटक केली होती. त्यानुसार आज (दि. 29) दुपारी 3 च्या दरम्यान वरवरा राव, अरुण परेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा निर्णय न्यायालयाने घेतला. त्याप्रमाणे पुढील सुनावणी होईपर्यंत आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.