Nigdi: – अजितदादांना कोणत्याही क्षणी अटक होईल – रावसाहेब दानवे

एमपीसी न्यूज – अजितदादांनी सिंचन घोटाळा केला आहे. त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल असे भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ‘अटल संकल्प महासंमेलन’ आयोजित केले आहे. या संमेलनाला मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याचा महापौर मुक्ता टिळक, पिंपरी शहराचे महापौर राहुल जाधव, शहाराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, सुरेश हळवणकर बाबुराव पाचर्णे, योगेश टिळेकर, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी महापौर आझम पानसरे, उमा खापरे, राजेश पिल्ले, तळेगांवच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, लोणावळ्याच्या सुरेखा चौधरी उपस्थित होते .

दानवे म्हणाले, 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. मावळ आणि शिरूर मधील कार्यकर्त्यांमध्ये उत्सहा आहे. 2014 मध्ये आम्ही मोदी लाटेवर निवडून आलो. मात्र त्यांनतर केंद्रात व राज्यात केलेल्या विकास कामांमुळे भाजपने प्रत्येक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. त्यातूनच हा पक्ष नंबर एकवर गेला आहे. आणि यापुढेही नंबर एकवर राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.