pune : ‘त्या’ बैठकीबाबत मला निमंत्रण दिले नाही; संजय काकडे

प्रदेशाअध्यक्ष दानवे दौऱ्यावर; पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची पार पडली बैठक

516

एमपीसी न्यूज – राज्यभरातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा दौरा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पुण्यातील 42 वा मतदारसंघ असल्याचे भाजप प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

HB_POST_INPOST_R_A

तर या बैठकीला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे दिसत नाही किंवा त्यांना निमंत्रण नव्हते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, पुणे शहर कार्यकारिणीने पुणे शहर लोकसभा मतदारसंघाच्या या बैठकीला जे निमंत्रित पदाधिकारी केले आहेत. तेच आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला त्या बैठकीबाबत निमंत्रण दिले नाही किंवा कल्पना दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे 2017 च्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक जिंकून येण्याचा अंदाज वर्तवला होता. तो अचूक आला होता. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे वजन वाढले होते. त्या निवडणुकीत काकडे यांनी ज्याना तिकीट मिळवून दिले ते देखील निवडून आले होते. त्यामुळे पुणे शहरात काकडे गट म्हणून मागील काही महिन्यात चर्चा सुरू होती.

तसेच संजय काकडे देखील काही नगरसेवकाच्या कार्यक्रमाला जाणे किंवा भाजपच्या व्यासपीठावर होते. या सर्व घडामोडी लक्षात घेता मलाच भाजपकडून उमेदवारी मिळेल असे संजय काकडे अनेकवेळा सांगत होते. मात्र, आजच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अंत्यत महत्वपूर्ण बैठकीला काकडे नसल्याची चर्चा अधिक एकण्यास मिळाली.

त्यावर प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ज्याना निमंत्रण दिले तेच आले आहेत, असे केल्याने भाजप संजय काकडे यांना दूर ठेवत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आता आगामी काळात संजय काकडे काय भूमिका घेतात? हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे, अशी चर्चा होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: