Rape Case in Marunji : कोल्डड्रिंकमध्ये गुंगीकारक औषध देऊन तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – एका तरुणाने एका तरुणीला (Rape Case in Marunji) बोलण्याच्या बहाण्याने घरी नेले. तरुणीला कोल्डड्रिंकमधून गुंगीकारक औषध दिले आणि बेशुद्ध केले. त्यांनतर तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार 23 मे मध्यरात्री एक ते पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत मारुंजी येथे घडला.

शुभम विनायक बने (वय 19, रा. रत्नागिरी) याला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi : डुडुळगावातून 9 लाख 62 हजारांचे दागिने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला ‘मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे’ असे म्हणून त्याच्या गाडीवर बसवून त्याच्या घरी नेले. घरी गेल्यानंतर आरोपीने तरुणीला कोल्डड्रिंकमधून गुंगीकारक औषध दिले आणि बेशुद्ध केले. त्यांनतर तरुणीच्या इच्छे विरुद्ध (Rape Case in Marunji) शारीरिक संबंध केले. तसेच पिडीत तरुणीला घरातून बाहेर जाण्यास आरोपीने मज्जाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.