Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2015 पासून जुलै 2018 दरम्यान साई प्रज्ञा भक्त निवास, शिरगाव येथे घडला. 

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुहास दत्तू रोकडे (वय 23, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी च-होली येथील आहे. निगडी येथे ती एका वसतिगृहात राहते. 2015 सालापासून रोकडे याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले होते. त्यातून तो तरुणीला मारहाण करून शिरगाव येथील साई प्रज्ञा भक्त निवास येथे वारंवार घेऊन जात होता. तिथे रोकडे तिच्यावर बलात्कार करीत होता. तीन वर्षानंतर देखील रोकडे याने तरुणीशी विवाह केला नाही. यावरून तरुणीने रविवारी (दि. 19) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. डब्ल्यू. वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.