Loni Kalbhor -मानलेल्या भावानेच केला विवाहितेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचे पाहून व चाकूने भोकसून जिवे मारण्याची धमकी देऊन मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने यातील आरोपीला अटक केली आहे.ही घटना रविवारी (दि.9) रात्री 11 च्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात घडली.

दादा भीमा केसकर (वय 24, रा. कासुर्डी, ता. दौंड) याला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला पती व दीड वर्षाच्या मुलासह येथे राहत आहे. विवाहितेचे नातेवाईक दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे
आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिला कासुर्डी येथे अधूनमधून जात होती. त्यामुळे तेथीलदादा केसकर याच्याशी तिची ओळख झाली होती. तिने त्याला भाऊ मानले होते. त्यामुळे तो अधूनमधून फिर्यादीच्या घरी येत होता.

8 सप्टेंबर रोजी तिचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्याने घरात महिला व तिचा दीड वर्षाचा मुलगा असे दोघेच होते. रात्री 11 वाजता दादा केसकर तिच्या घरी येऊन तू मला खूप आवडते असे तिला म्हणाला. आपण बहीण-भाऊ आहोत असे महिला त्याला म्हणाली. परंतु, आरोपीने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबला व ओरडली तर चाकूने भोकसून ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी ताबडतोब माहिती मिळताच आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.