Pune News : मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पुण्यातील चंदन नगर परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीवर मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले. सातत्याने पैशाची मागणी होत असल्याने या तरुणीने अखेर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. 

सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय २२) आणि आशिष विजय कांबळे (वय २३, दोघे रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ पीडित तरुणीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने सोशल मीडियावर तरुणीला संदेश पाठविला होता. तू मला खूप आवडतेस, असे त्याने संदेशात म्हटले होते. यानंतर सिद्धार्थ तरुणीला मोटारीत घेऊन फिरायला गेला. तिला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने मोबाईल मध्ये तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 17 हजार रुपये उकळले.

दरम्यान सिद्धार्थ चा मित्र असलेल्या आशिष ने देखील पिडीत तरुणीला धमकवण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने पीडित तरुणीला मारहाण करुन पैशांची मागणी केली. दोघांच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.