Pune News : लग्नाच्या आमिषाने महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून लग्नाच्या आमिषाने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवून गरोदर राहिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

17 वर्षीय तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीही धायरी फाटा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 22 वर्षीय तरुणाने वर नमूद केलेल्या कालावधीत तिचा पाठलाग करून तिच्याकडे प्रेमाची गळ घातली. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून एका रूम वर घेऊन जात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

यातून ही तरुणी 22 आठवड्यांची गरोदर राहिली. त्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.  सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.