Chikhali News : उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर बलात्कार

दुष्कृत्याचा व्हिडीओ नातेवाईकांच्या सोशल मीडियावर व्हायरल

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला उसाच्या रसातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ बनवून तो नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल केला. ही घटना 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत चिखली परिसरात घडली.

याबाबत 30 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विवाहित महिलेच्या चुलत दिराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला तिच्या चुलत दिराने उसाच्या रसमधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या दुष्कृत्याचा आरोपीने व्हिडीओ तयार केला. 8 फेब्रुवारी रोजी आरोपीने तो व्हिडीओ पीडित विवाहित महिला, तिचा पती, इतर नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या व्हाट्सअपवर पाठवून तिची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1