Pune Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले

0

एमपीसी न्यूज : पुण्यातील बावधन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आरोपीने या संपुर्ण प्रकाराचा अश्लील व्हिडिओ तयार करत तिच्याकडे बार-बार शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिला बावधन टेकडीवर नेहून तिला अश्लील बोलून विनयभंग केला. तर मुलीचे आईवडील मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून सतत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. 2017 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी सतरा वर्षाची असताना आरोपीने बावधन परिसरात तिचा रस्ता आडवला. तिला दमदाटी करून बावधन परिसरातीलच एका टेकडीवर नेले. तिथे तिच्या सोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर 2019 मध्ये पीडित मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले असताना आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी व्हिडिओ देखील काढला होता. हा व्हिडिओ तिच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तो तिला त्रास देऊ लागला.

दरम्यान याच व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून त्याने पीडित मुलीच्या मित्रालाही सोशल मीडियाद्वारे पाठवला. त्यानंतर पीडित मुलींनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment