Bhosari News : लग्नाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिश दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार जून 2021 मध्ये भोसरी परिसरात घडला.

गोट्या मांडवकर (वय अंदाजे 20, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 44 वर्षीय आईने भोसरी 21 ऑक्टोबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला प्रपोज करून तिच्याशी गोड बोलून तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे अमिश दाखवले. फिर्यादी यांच्या घरामध्ये कोणी नसताना जून 2021 या महिन्यात आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी गर्भवती राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.