Pimpri News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपी अल्पेश याने पीडित अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध ठेवले.

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जुलै 2018 पासून 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत भाटनगर, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथे घडला आहे. याबाबत 24 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पेश हनुमंत कांबळे (वय 22, रा. भाटनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पेश याने पीडित अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध ठेवले. तसेच आरोपीने 15 जुलै 2018 पासून 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत पीडित मुलीला भाटनगर येथील राहत्या घरी, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.