Alandi : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार ; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील चार आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.

सद्दाम अब्दुलबारी हुसेन, बिर्याणीवाला सलमान भाई, सचिन अशोक गावडे (तिघे रा. धानोरे, ता. खेड), आकाश अनिल झरकर (रा. धानोरे फाटा, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती भंगारचा व्यवसाय करतात. पीडित महिलेच्या पतीची आणि आरोपींची भंगाराच्या व्यवसायात काही कारणांवरून भांडण झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित महिला तिच्या कुदळवाडी येथे राहणा-या नणंदेच्या घरी जाण्यास निघाली. सद्दाम आणि बिर्याणीवाला यांच्या सांगण्यावरून सचिन आणि आकाश यांनी पीडित महिलेला तिच्या नणंदेच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने एका पडीक घरामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावरून महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी देखील तत्परता दाखवत चारही आरोपींना अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.