Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने पोलिसात फिर्याद दिली असून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नयिम बसिर शेख (वय 24, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय पिडीत तरुणीने बुधवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीला शेख याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार 27 ऑगस्ट 2019 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.