Pune News : मित्राच्या रूमवर नेऊन तरुणीवर बलात्कार

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसेही उकळले

एमपीसी न्यूज : तरुणाने हाताचे ऑपरेशन असल्यामुळे गावाकडील ओळखीच्या तरुणीला पुण्यामध्ये मदतीला बोलावले. नंतर तिच्यावर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ तयार करून ते व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बावीस वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली असून सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने 2018 मध्ये फिर्यादीला हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून मदत करण्यासाठी म्हणून पुण्यात आणले होते. त्यानंतर तिला पुण्यातील मित्रांच्या रूमवर घेऊन जात बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पंधरा हजार रुपये ही आरोपीने घेतले होते.

दरम्यान हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला तर ठार मारेल आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी आरोपी करून वारंवार पीडित तरुणीला दिली जात होते. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने अखेर पोलिसात तक्रार दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.