Dehuroad : मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणीला दुचाकीवरून त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत 31 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

दिक्षांश राय (वय 21, रा. किवळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 20 वर्षीय पिडीत तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राय आणि पिडीत तरुणी यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. 23 सप्टेंबर रोजी राय याने कार्यक्रमाचा बहाणा करून तरुणीला त्याच्या दुचाकीवरून घरी नेले. तिथे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास तरुणीच्या घरी, मित्रांना हा प्रकार सांगीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.