Pune News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

एमपीसी न्यूज : पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पहिल्या घटनेत 17 वर्षीय मुली सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यात आले. याविषयी कुठे वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी आरोपीने दिली होती. परंतु पीडित मुलीने घरच्यांना माहिती दिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी विकास उर्फ विकी हनुमंत फासगे (वय 22) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. सोळा वर्षे मुलीसोबत ओळखीच्या एका तरुणाने जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. यातून ही मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर कोथरुड पोलिसांनी रवींद्र बाळू गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.