Lonikand : लोणीकंद येथून पावणे पाच लाखांच्या पुरातन दुर्मीळ वस्तू चोरीला

एमपीसी न्यूज – लोणीकंद (Lonikand)येथून एका बंद दुकानाचे शटर उटकटून चोरट्यांनी तब्बल पावणे पाच लाख रुपयांच्या अँटिक म्हणजे पुरातन दुर्मीळ वस्तू चोरून नेल्या आहेत. हा प्रकार 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान लोणीकंद येथील शिरसवाडी येथे घडली.

याप्रकरणी महायार इराणी (वय 49 रा. कॅम्प, पुणे) यांनी शनिवारी (दि.1) उशीरा लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vasanta More : पुलाचा ठेकेदार किती भारी असेल, आमची सत्ता आली तर… वसंत मोरेंचं ट्विट चर्चेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अँटिक गोष्टी (Lonikand) जमा करण्याचा छंद आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक गोष्टी जमवल्या होत्या. त्या फिर्यादीनी त्यांच्या लोणीकंद येथील शॉपमध्ये ठेवल्या होत्या.चोरट्यांनी याच शॉपचे शटर उचकटून शॉपमधील तब्बल 4 लाख 74 हजार रुपयांच्या अन्टीक वस्तू चोरून नेल्या आहेत. यावरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.