Aundh : राष्ट्रीय सैनिक संस्था आणि द्वारकादास श्याम कुमार यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

एमपीसी न्यूज : समाजातील विकृतीला महिलाच आळा घालू शकतात, प्रत्येक वीर नारी स्त्री शक्तीचे रूप आहे, स्त्री मध्ये खरी ताकद लपली आहे, (Aundh) त्याचा वापर केला पाहिजे, महिलांनी स्वतः ला सिद्ध केले पाहिजे, समाजात स्वतःची ओळख निर्माण करा असे प्रतिपादन विद्या आदित्य भोसले यांनी केले.

राष्ट्रीय सैनिक संस्था आणि द्वारकादास श्याम कुमार यांच्या संयुक्त विद्यमाने औंध मिलिटरी स्टेशनच्या लष्करी छावणी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रथम दीप प्रज्वलन करून, भारत माता प्रतिमेचे पूजन करून, शहीदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

धार्मिक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे रणांगणावर ज्यांना वीरगती लाभते, त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. त्यांना अमर जवान असे म्हटले जाते. त्या अमर जवानाची अर्धांगिनी म्हणजे आमच्यासाठी खरे तर देवदूतच आणि शांतिदूत आहेत. अशा ह्या अमर जवानाच्या अर्धांगिनीला मकर संक्रातीचा वाण आणि सुहासिनीचा शृंगार करण्याचा नक्कीच अधिकार आहे. अशा वीर नारींचा सन्मान गेली दहा वर्ष राष्ट्रीय सैनिक संस्था करीत आलेली आहे.

Pune News : मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

यावर्षी वीर नारींच्या हस्ते औंध मिलिटरी स्टेशन येथील लष्करी छावणी मधील सेवारत असलेल्या फौजींच्या सुहासिनींना वीर पत्नींच्या हस्ते संक्रांतीचे वाण आणि प्रसिद्ध कपडा (Aundh) व्यापारी द्वारकादास श्याम कुमार प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड यांचे व्यवस्थापक सिताराम जी जाखड यांच्यावतीने वस्त्रालंकार म्हणून साड्या देण्यात आल्या.

स्मिता माने आणि किशोरी अग्निहोत्री यांनी केले आभार मानले. याप्रसंगी वीर पत्नी श्रीमती मंगलताई तुळशीराम साळुंखे (भारत पाक युद्ध 1971) श्रीमती मीनाक्षीताई शिरीषकुमार भिसे, वीर कन्या श्वेता उर्फ हिमांचली शिरीषकुमार भिसे
(ऑपरेशन रक्षक कारगिल युद्ध 1999) शितलताई संतोष जगदाळे (ऑपरेशन विजय कारगिल युद्ध 2015)
सोनाली सौरभ फराटे (पेम्पोर हमला 2016) माजी सैनिक पत्नी माधुरी जाधव, सैन्य अधिकाऱ्याची माता वंदना विजय बिर्जे,माजी सैनिकांच्या सुनबाई शुभांगी उमेश सरोते, स्मिता सुधीर माने, नियती नवनाथ खराडॆ, निशा नवनाथ खराडॆ, आयोजक शुभांगी उमेश सरोते, विद्या आदित्य भोसले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.