Bhosari: पाणी प्रश्न पेटला; भोसरीत महिलांचा रास्ता रोको

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न पेटला आहे. मागील आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने भोसरी येथील प्रभाग क्रमांक पाच महादेवनगर, सावंतनगर येथील संतप्त झालेल्या महिलांनी आज (बुधवारी) रात्री आठ वाजता रस्ता रोको केला. मोठ्या संख्येने हंडा घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परंतु, एक दिवसाआड पाणी पुरवठा केला. तरी देखील तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध वाढत आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्यापासून प्रभाग क्रमांक पाच मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. कमी वेळच पाणी येते. दुषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. रात्री-अपरात्री पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. चिडलेल्या महिलांनी रात्री आठ वाजता हंडा घेऊन रस्त्यावर उतरल्या. रस्ता रोको केला. त्यामुळे नगरसेवक, अधिकाऱ्यांची झोपच उडाली.स्थानिक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांची समजूत काढली. त्यांनतर महिला रस्त्यावरून उठल्या आणि आंदोलन मागे घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.