_MPC_DIR_MPU_III

Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी

Rath Yatra: Conditional permission from the Supreme Court for Jagannath Rath Yatra आरोग्यासंदर्भातील कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – ओडिशातील पुरीमधील जगन्नाथ रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने अखेर सशर्त परवानगी दिली आहे, राज्य सरकार आणि मंदिर न्यासाच्या सहकार्याने आरोग्यसंबंधीचा कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता आणि योग्य ती खबरदारी घेऊन या रथ यात्रेचं आयोजन करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

देशभरात परसत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेला स्थगिती दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखला झाल्या होत्या. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी केली.

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. काही अटी-शर्थींसह ही रथयात्रा सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पाडला जाऊ शकतो, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. लोकांची गर्दी न करता, कोरोनाची चाचणी करुन पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा पार पाडली जाऊ शकते, अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली.

प्लेग महामारीच्या काळातही या रथ यात्रेचे अशाच प्रकारे सशर्त आयोजन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण

दूरदर्शनवर जगन्नाथ रथयात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी घोषणा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. भगवान जगन्नाथ रथ यात्रेला मंजुरी मिळाल्याने संपूर्ण देश खूश आहे, देशवासीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देत आहेत. उद्या (मंगळवारी) दूरदर्शन व अन्य दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून या रथयात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात आग्रही मागणी केली होती, असे जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.