Rathani: रहाटणीतील घरे नियमित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण निगडी येथील अनधिकृत घरांना पाच टक्के दंड आकारुन नियमित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रहाटणी येथील घरांना देखील नियमित करुन घ्यावे, अशी मागणी रहाटणी रहिवासी कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, हवेली तालुक्‍यांतर्गत येणा-या रहाटणीत सर्वसामान्य नागरिक, माजी सैनिक, निवृत्त कामगार वर्ग 31 वर्षापासून वास्तव्याला आहेत. आपली आयुष्याची कमाई देवून घरांसाठी सरकारी स्टॅम्प ड्युटी भरुन 1985 ते 2000 सालापर्यंत जागा खरेदी केली आहे.

महापालिकेने येथील नागरिकांना करोडो रुपये खर्च करुन सुविधा पुरविल्या व प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिलेला आहे. येथील काही नागरिकांच्या सिटी सर्व्हेमध्ये नोंदी, सनद व 7/12 वर कच्चा प्राधिकरणाचा शेरा आदी कागदपत्रे आहेत. आत्तापर्यंत महापालिकेचा नियमित कर भरत आहोत. यामुळे निगडीच्या धर्तीवर येथील घरे नियमित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.