Rahatni : शिवसेनेतून युवराज दाखले यांची हकालपट्टी

एमपीसी न्यूज – चिंचवड, रहाटणीतील युवराज दाखले हे शिवसेनेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दाखले यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवराज दाखले हे शिवसेनेच्या कोणत्याही पदावर नाहीत. त्यांची शिव व्यापारी संघटना शिवसेनेशी संलग्न नाही. दाखले शिवसेनेचे नाव घेऊन सर्वसाधारण नागरिक, प्रशासनाला वेठीस धरत असतील. तर, त्यांच्याशी शिवसेनेचा काहीच संबंध नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्राधिकरण अतिक्रमण विभागाला अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही, असे सांगून चौघांकडून एक लाख 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच दाखले यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.