Rathasaptami Special : रथसप्तमी चे खगोलशास्त्रीय महत्व

एमपीसी न्यूज – वैदिक काळापासून अनेक प्रकारच्या उपासना आपण करीत आहोत. वेदात सर्व काही आहे ही आपली श्रध्दा (Rathasaptami Special) असते. त्यातील ज्ञान मात्र समजून न घेताच आपण ही विधान करीत असतो. या मुळेच भारतीय समाज हा सण आणी रुढी पंरपरा मानणारा अंधश्रध्दाळू समाज आहे , अशी काहीशी भावना सर्वांच्या मनात असते. सर्व समान्य लोक ही या दिवसाचे महत्व जाणून न घेता परंपरा म्हणून ते साजरे करताना दिसतात.

वैदिक काळापासून म्हणजे सुमारे 3500 वर्षापासून भारतीयांना हे ज्ञात होते की पृथ्वी गोल आहे . सूर्य हा केंद्रबिंदू असून तो स्थिर आहे. सर्व ग्रह नक्षत्र तारे हे स्वत: भवती फिरताना सूर्याभोवती आपआपल्या कक्षेतून फिरत आहे.  पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यातूनच दिवस-रात्र आणी ऋतूचक्र तयार झाले. या बदलांना विशिष्ट खगोलीय स्थिती कारक असते. तो दिवस निश्चित करण्या साठी भारतीयांनी पंचाग तयार केले. प्राचिन भारतीय लोकांनी ज्योतिष आणी  खगोलशास्त्राचा उपयोग कालगणनेसाठी केला आहे.

Chikhli News : ‘इंटरनेट व सोशल मीडिया मुक्त …एक दिवस ग्राउंड वरती’ संकल्पने अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा

हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते.  1.ब्राह्म, 2..दिव्य, 3.पित्र्य, 4.प्राजापत्य, 5.बार्हस्पत्य, 6.सौर, 7.सावन, 8.चांद्र , 9.नक्षत्र. त्या पैकी सौरमान ,चांद्रमान आणि नक्षत्रमान प्रमुख आहेत. खगोलशास्त्रीय ज्ञान सर्वसामान्य व अशिक्षीत लोकांपर्यत पोहचविण्यासाठी या खगोलशास्त्रीय महत्वाच्या दिवसांसाठी विशिष्ट सणांची परंपरा सुरु केली.

त्या मागील माहिती सोप्या भाषेत सांगण्यासाठी पुराणकथा रचण्यात आल्या . या कथा वर्षानुवर्षे एका पिढीतून दुस-या पिढीपर्यत लोककथेतुन , किर्तनातुन, ग्रंथातुन आपण ऐकत असतो. कथेला आणी व्रताला धार्मिक महत्व जास्त प्राप्त झाल्याने त्यातील वैज्ञानिक महत्व कमी कमी झाले आणि आजकाल ते नाकारण्यास (Rathasaptami Special) ही सुरुवात झाली आहे.

रथसप्तमी  हा मकरसंक्रातीनंतर सूर्याच्या खगोलीय स्थितीतील बदलामधील महत्वाचा दिवस

मकरसंक्रातीस सूर्य मकरराशीमध्ये प्रवेश करुन उत्तरायणास प्रारंभ करतो. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस हा रथसप्तमी म्हणून देशात विविध नावाने साजरा होतो.  सूर्य सप्तमी, अचला सप्तमी, रथ आरोग्य सप्तमी अशी विविध नावे आहे . या नावातच त्याचे महत्व विशद केलेले आहे.

सूर्याच्या रथाचे आठ घोडे हे आठ वारांचे प्रतिक आहे . सूर्याच्या रथाचा सारथी आरुणी हा क्रांतीवृताचा प्रतिक आहे. पुराण कथेनुसार हा सूर्याचा जन्म दिवस आहे.  काही परंपरेनुसार सूर्याचे रथावर चढण्याचा दिवस म्हणून रथ सप्तमी आहे .  खरे तर सूर्याच्या जन्म दिवस माहीत असणारा सूर्या आधी जन्मास आलेला हवा. त्या मुळे याचा शब्दशा अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घेणे महत्वाचे आहे. एखादया गोष्टीची नव्याने सुरूवात होणे म्हणजे जन्म होणे असा अर्थ वैदिक साहित्यात सांगितला आहे.

रथ सप्तमी ही सूर्याची उत्तरायणातून होणा-या कालगणणेतील महत्वाची आवस्था आहे.प्राचीन ग्रंथांमध्ये सूर्याला रोगमुक्त करणारा मानले गेले आहे, या दिवशी भक्त भगवान सूर्यासाठी उपवास करतात. सूर्यप्रकाशाशिवाय जगात काहीही होणार नाही. जे सूर्यदेवाची पूजा करतात आणि या सप्तमीचे व्रत करतात त्यांचे सर्व रोग बरे होतात. सध्याच्या काळातही सूर्यचिकित्सा आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार पद्धतींमध्ये वापरली जाते.

शारीरिक कमजोरी, हाडे कमजोर होणे किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्यांमध्ये भगवान सूर्याची आराधना केल्याने रोगापासून मुक्ती मिळते. सूर्याकडे तोंड करून सूर्याची स्तुती केल्याने शारीरिक चर्मरोग इत्यादींचा नाश (Rathasaptami Special) होतो. पुत्रप्राप्तीसाठीही या व्रताचे महत्त्व मानले गेले आहे. श्रद्धेने हे व्रत केल्याने पिता-पुत्रात प्रेम कायम राहते.

पाप पुण्य या संकल्पनेच्या बाहेर येऊन , खगोलीय माहितीचा ठेवा म्हणून आपण हे सण  साजरे करायला हवेत. परंपरा आणी विज्ञान यांची सांगड घालून आपण आपली वाटचाल सूर्यासारखी सतत कायम ठेवली पाहिजे .

अजित देशपांडे

9850400310

संतसाहित्य अभ्यासक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.