Ratris Khel Chale Ends: आता रात्रीस ‘देवमाणसा’चा खेळ चालणार…

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. तसेच दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

एमपीसी न्यूज – ‘कोकणातली भुता एकदा धरला की सोडत नाय’ ही भीतीदायक टॅगलाइन घेऊन आलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या नावाची मालिका झी मराठी वाहिनीवर अतिशय लोकप्रिय ठरली. खरंतर तर त्यात माणसाच्या मनाचे खेळ मांडलेले होते. त्यानंतर तिचा सिक्वल, पण त्या आधी काय घडलं होतं हे दाखवणारी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले 2’ आली. मालिकांच्या इतिहासात खरंतर हे वेगळं होते. म्हणजे आधी मालिका लोकप्रिय झाली की तिचा सिक्वल येतो. इथे उलटे झाले होते. दाखवलेल्या मालिकेच्या आधी काय झाले हे दाखवणारी दुसरी मालिका होती.

मात्र आता ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका निरोप घेणार आहे. तशा जाहिराती झी वर झळकायला लागल्या आहेत. 29 ऑगस्टला रात्रीचा खेळ संपणार आहे आणि त्याजागी आणखी एक थ्रिलर ‘देवमाणूस’ ही मालिका येणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. तसेच दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

‘देवमाणूस’ या मालिकेत ‘लागीरं झालं जी’मधील अतिशय लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच शिवानी घाटके देखील या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. ही एक थ्रिलर मालिका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.