Ravan Dahan : क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे यमुनानगर येथे होणार 40 फुटी रावणाचे दहन

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर मित्र मंडळ यांचा वतीने उद्या (रविवारी) महाभोंडला व संगीत खुर्ची आयोजित केली आहे. तसेच भव्य 40 फुटी रावणदहन (Ravan Dahan) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे आयोजक, माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी दिली.यमुनानगर-निगडी येथे  सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मागील 20 वर्षांपासून या वर्षीही क्रांतिवीर मित्र मंडळ आयोजित नवमी नवरात्र उत्सव यमुनानगर वतीने रास दांडिया उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंडळाच्या वतीने जोरदार कार्यक्रमाची तयारी चालू आहे. या उत्सवात अनेक प्रकारची विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहे.

5 ऑक्टोबर 2022 पर्यंत ठाकरे मैदान यमुनानगर येथे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. उद्या (रविवारी) सायंकाळी 6 वाजता महाभोंडला व संगीत खुर्ची आयोजित केली आहे. विशेष आकर्षण म्हणून 40 फुटी रावण दहन (Ravan Dahan) आयोजित केले आहे.

PCMC : महापालिका 31 ऑक्टोबरपर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा उचलणार; सोसायटी धारकांना दिलासा

या कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक इरफान सय्यद, प्रेरणास्थान उदयकुमार डिगा, मंडळाचे मार्गदर्शक माजी पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक दत्ता पवळे, उत्सव प्रमुख श्रीकांत सुतार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.