BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज – रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड पोलिसांनी आज (शनिवारी) दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.विक्रांत सुभाष कांबळे (वय 20, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हनुमांत बांगर यांना माहिती मिळाली की, एक तरुण कस्पटेवस्ती कडून हिंजवडीच्या दिशेने बुलेट वरून जात आहे. त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज येथे सापळा रचून विक्रांत याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला.

विक्रांतची चौकशी केली असता तो देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी विक्रांतला बेड्या ठोकल्या. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3