Ravet : विजेच्या धक्‍क्‍याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरातील पाणी तापविण्याच्या हिटरला हात लावताच विजेच्या धक्‍क्‍याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे मंगळवारी (दि. 4) दुपारी पावणेचार वाजता घडली.

दिव्या कैलास गराड (वय 4, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गराड हे मजुरीचे काम करतात. तर त्यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते राहते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र सामान पसरलेले होते. सामान हलवण्याच्या घाईत घरातील पाणी तापवायचे हिटर चालूच राहीले होते.

यावेळी दिव्या तेथे खेळत-खेळत आली व तीने हिटरला हात लावला. त्यामुळे तिला जोराचा झटका बसला व ती जागीच बेशुद्ध झाली. पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.