Ravet : जमिनीच्या वादातून एकावर खूनी हल्ला; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून दोघांनी मिळून भावकीतील एकावर खूनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडे पाचच्या सुमारास रावेत येथे घडली.

साहेबराव तुकाराम भोंडवे (वय 61, रा. रावेत गावठाण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकाश ज्ञानेश्वर भोंडवे आणि अमोल विलास भोंडवे (दोघे रा. रावेत गावठाण) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी साहेबराव भोंडवे आणि आरोपी यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास जखमी साहेबराव शेतामध्ये पाणी भरत असताना दोन्ही आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये साहेबराव गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर रावेत पोलीस चौकीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.