Ravet : ट्रकवर कार आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणारी स्विफ्टकार समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवारी) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर घडला.

अभिषेक रवींद्र शर्मा (रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड), सुरज राजेंद्र मांजरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य एकजण जखमी आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरील तिघेजण स्विफ्ट कारमधून (एमएच 12 / इएम 9974) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होते. रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर आले असता कार एका ट्रकवर (जीजे 31 / टी 2614) आदळली.

या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.