Ravet : काम सोडलेल्या चालकाने केला तीस हजारांच्या डिझेलचा अपहार

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम (Ravet) करणाऱ्या एका कामगाराने काम सोडल्यानंतर देखील त्याच्याकडे असलेल्या स्मार्ट कार्डद्वारे तीस हजार रुपयांचे डिझेल भरून अपहार केला. हा प्रकार 5 डिसेंबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पुनावळे येथील भारत पेट्रोल पंप साईकृपा सर्विसेस येथे घडला.

करूनेश सुरेश वर्मा (वय 46, रा. खारघर नवी मुंबई) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज शेख मोहम्मद (रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये श्रीरंग बारणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होता. दरम्यान फिर्यादी यांनी मोहम्मद याला पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये डिझेल भरण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले होते. त्या स्मार्ट कार्डच्या आधारे आरोपी मोहम्मद वाहनांमध्ये डिझेल भरत असे.

मागील काही महिन्यांपूर्वी मोहम्मद याने फिर्यादी यांच्या कंपनीतील काम सोडले. काम सोडल्यानंतर देखील कंपनीचे स्मार्ट कार्ड त्याच्याकडे होते. त्या स्मार्ट कार्डचा वापर करून त्याने 30 हजार 750 रुपयांचे (Ravet) डिझेल इतर वाहनांमध्ये भरून त्या रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.