Ravet : अज्ञात चोरट्याने चोरली रोडवर पार्क केलेली रिक्षा

एमपीसी न्यूज : रोडवर पार्क केलेली रिक्षा रावेतमधून (Ravet) 22 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी रिक्षा मालक नागेश काळे (वय 30 वर्षे, रा. चिखली) यांनी देहूरोड (रावेत) पोलिस ठाण्यात 26 जूनला फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : वारीत घुसलेल्या मोबाईल चोर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

फिर्यादी यांनी त्यांची ऑटो रिक्षा 22 एप्रिलला दुपारी 12 च्या दरम्यान एस. बी. पाटील रोड रावेत या ठिकाणी बंद पडल्यामुळे पार्क केली होती. 25 एप्रिल दुपारी 1 वा फिर्यादी त्या ठिकाणी गेल्यावर तेथे रिक्षा नव्हती. त्यांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला पण तरीही रिक्षा मिळाली नाही. म्हणून आता फिर्यादीची खात्री झाली, की ती रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून (Ravet) नेली आहे. म्हणून अखेर दोन महिन्यांनी त्यांनी फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.