Ravet : आमच्याकडे का बघून हसतोय म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आमच्याकडे बघून का ( Ravet) हसत आहेस म्हणत दोन माथेफिरूंनी एका 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना रविवारी (दि.21) रावेत येथील शिवराज हॉटेल येथे घडली आहे.

याप्रकरणात रावेत पोलिसांनी तुषार वैजनाथ सोनवणे (वय 23 रा.औंध) व वैभव उल्हास शिंदे (वय 26 रा.पुनावळे) यांना अटक केली आहे. मोहीत टुनटुन सिंग (वय 23 रा.चिंचवड)हा तरुण यात जखमी झाला असून त्याने रावेत पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Maval LokSabha Elections 2024 :  शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत रावेत येथील शिवराज हॉटेल येथेगेले होते. यावेळी त्यांचे मित्र आणि त्यांच्यात मज्जा व गप्पा सुरु होत्या. यावेळी आरोपी हे जवळच्या दुसऱ्या टेबलवर बसले होते.

यावेळी तू आमच्याकडे बघून का हसतोय म्हणत आरोपींनी  शिवीगाळ केली व त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर, गालावर, छातीवर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, यावरून रावेत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला ( Ravet) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.