Highway Accident : पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे ट्रकने सहा कामगारांना उडवले

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावरील कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर रावेत परिसरात भीषण अपघात (Highway Accident) झाला. यामध्ये एका ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या पाच ते सहा कामगारांना चिरडले. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समीर लॉन्सजवळ सोमवारी (दि. 30) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. 

पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. रात्री देखील हे काम सुरू होते. सोमवारी पहाटे रस्त्याचे काम करत असलेल्या कामगारांना पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने उडवले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. यात (Highway Accident) एका कामगाराचा जागेवर मृत्यू झाला. तर चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत.

 

Pune News : युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वीडनची दारे खुली

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. याबाबत (Highway Accident) गुन्हा दाखल करून पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.