Ravet: विरोधात कुणीही असो विजय श्रीरंग बारणे यांचाच होणार

रावेत येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत सूर

एमपीसी न्यूज – विकासकामे आणि सर्वसामान्य माणसांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते तसेच विकासकामे करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने विरोधात कोणताही उमेदवार असला तरी विजय केवळ खासदार श्रीरंग बारणे यांचाच होणार, असा सूर रावेत येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत आला. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्याचा निश्चय केला.

बैठकीसाठी शिवसेना-भाजप-रिपाइ, रासप, रयत क्रांती संघटनेच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, जिल्हाध्यक्ष मावळ गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, दिवणजी भोंडवे, नंदकुमार भोंडवे, मधुकर भोंडवे, बाबासाहेब भोंडवे, दीपक भोंडवे, तुषार भोंडवे, बाळासाहेब वाल्हेकर, संदीप घोजगे, दिलीप भोंडवे, नरेंद्र सोनटक्के, साहेबराव भोंडवे, आतिश भोंडवे, हृषीकेश भोंडवे आदी उपस्थित होते.

  • यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. निवडणूक भावनेवर लढवली जात नाही. भावनिक आवाहन केल्याने मतदार फसत नाही. मतदार राजा जागरूक आहे. ज्या उमेदवाराने काम केलं आहे. ज्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत, अशाच उमेदवाराला जनता निवडून देणार आहे. विरोधकांच्या तथाकथित बड्या हस्ती सध्या शहरात ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांना हारण्याची भीती आहे. ही लढाई मावळच्या स्वाभिमानाची आहे. मावळचा प्रत्येक मावळा आपला स्वाभिमान जपणार आहे.”

खासदार श्रीरंग बारणे यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. ज्या उमेदवाराला स्थानिक प्रश्नांची जाण आहे. तोच उमेदवार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. असे जिल्हाध्यक्ष मावळ गजानन चिंचवडे म्हणाले.

  • ज्या उमेदवाराला वाचून सुद्धा भाषण करता येत नाही, तो उमेदवार नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लावेल?, हाच मोठा प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक हा देशहिताचा प्रश्न आहे. त्यासाठी चांगला आणि अनुभवी उमेदवार हवा, असे मधुकर भोंडवे म्हणाले.

त्यानंतर नंदकुमार भोंडवे म्हणाले, “खासदार बारणे यांची गुणवत्ता देशाच्या संसदेतून संपूर्ण देशाने पाहिली आहे. असा गुणवत्तापूर्ण उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघाला लाभला आहे. याचा सर्व मावळ वासीयांना सार्थ अभिमान आहे. पुढील निवडणुकीत देखील श्रीरंग बारणे विजयी होतील.”

  • विद्यमान खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा निवडून येणार आहेत. हा विश्वास सर्वांना आहे. आता प्रचार मताधिक्याचा आकडा वाढविण्यासाठी आणि खासदार बारणे यांचे काम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करायचा आहे, असे नवनाथ तरस म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वास नरेंद्र सोनटक्के यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.