Ravet : वाल्हेकरवाडीत उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन झोन पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत शाखा वाल्हेकरवाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 8 डिसेंबर) केले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 8 डिसेंबर)  सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत पीसीएमसी शाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी या ठिकाणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रक्तदाना बद्दल लोकांमध्ये जनजागृती आणि संदेश देण्याच्या हेतूने वाल्हेकरवाडी परिसरामध्ये घर भेटी उपक्रमाच्या माध्यमातून फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी रक्तदानाविषयी जनजागृती केली. यामध्ये नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच 8 डिसेंबर सकाळी 7 वाजता पदयात्राकाडून रक्तदानाचा संदेश दिला जाणार आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त नाल्यामध्ये नाही तर मानवी नसानमध्ये वाहने गरजेचे आहे या सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या उद्घोष्णेनुसार 1986 सालापासून संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची श्रुंखला अविरतपणे चालू आहे.

आतापर्यंत 10 लाखा पेक्षा जास्त युनिट रक्तदान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्वानी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून मानवतेच्या कार्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन सद्गुरू सुदिक्षा माताजी यांचे परमशिष्य रामचंद्र लाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.