Ravet: शहरातील गुरुवारी सायंकाळाचा पाणीपुरवठा बंद!

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे आणि सेक्टर 23 निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्याकरिता गुरुवारी (दि. 30) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार असून सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक कामे आणि सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक, पाणीपुरवठा विषयक नियमित कामे केली जाणार आहेत.

त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागातील सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारचा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उलब्ध पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like