Ravet Crime News : डी मार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या कारच्या काचा फोडून पावणे आठ लाखांचा ऐवज लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – रावेत येथील डी मार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांच्या कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी 7 लाख 79 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

प्रशांत प्रभाकर जगताप (वय 33, रा. पुनावळे) यांनी याबाबत रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी जगताप आणि त्यांची पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी रावेत येथील डी मार्टमध्ये आले होते. त्यांनी त्यांची कार (एमएच 12 / एनएच 1235) डी मार्ट समोर पार्क केली.

जगताप दाम्पत्य दिवाळीचे साहित्य खरेदीत मग्न असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची डाव्या बाजूची मागील काच फोडली. त्यानंतर कारमधून सोन्याचे, हिऱ्याचे दागिने, निकॉन कंपनीचा कॅमेरा किटसह, दोन ट्रॉली बॅग, चार जोडी शूज, टॅब, घड्याळ, तीन लॅपटॉप चोरून नेला.

तसेच चोरटयांनी जगताप यांच्या कार शेजारी लावलेल्या अन्य एका कारची (एम एच 14 / एच डब्ल्यू 3151) काच फोडून 35 हजारांची रोकड चोरली. दोन्ही कार मधून चोरट्यांनी तब्बल 7 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज पळवला.

पोलीस उपनिरीक्षक प्रसाद दळवी तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.