Ravet Crime News : महिलेची आर्थिक फसवणूक करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेची आर्थिक फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या विरोधात (Ravet Crime News) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते आज अखेरपर्यंत घडला.

याप्रकऱणी महिलेने फिर्याद दिली असून अभिजीत अरूण ताजणे (वय 38) व महिला आरोपी (वय 37) दोघे राहणार ठाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : शिवजयंतीनिमित्त पालिकेतर्फे विविध कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी यांनी ,रावेत येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये मेडीकल टाकण्याच्या बहाण्याने डिपाॅजीट म्हणून 20 लाख रुपये व हॉस्पीटलसाठी 28 लाख 40 हजार 659 रुपये असे एकूण  48 लाख 40 हजार 659 रुपये घेतले. हॉस्पीटल सोडल्यानंतर डिपॉजीट व उसने घेतलेले पैसे एका वर्षात देऊ असे फिर्यादी यांना सांगण्यात आले. मात्र वर्ष उलटून गेले तरी पैसे दिले नाही. फिर्यादी यांनी पैशांची मागणी  केली असता देतो-देतो म्हणून चाल ढकल केली.

आरोपीने फिर्यादी यांना तू मला आवडतेस म्हणत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले, पुढे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत लैंगिक छळ केला. पैशांची मागणी केली असता बदनामीची धमकी देत फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून (Ravet Crime News) पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.