Ravet Crime News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2017 ते 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मस्के वस्ती, रावेत येथे घडला.

सचिन प्रभाकर कुलकर्णी (वय 36, रा. मस्के वस्ती, रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ चेतन सुभाष बिरारी (वय 36, रा. नाशिक) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि फिर्यादी यांची बहीण यांचा विवाह झाला होता. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.

वारंवार होणा-या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यासाठी तिचा पती आरोपी सचिन याने प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.