Ravet Crime News : रम्मी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – रम्मी जुगार खेळणा-या आठ जणांना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून 22 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ही कारवाई रविवारी (दि. 4) दुपारी भोंडवे कॉर्नर, रावेत येथे करण्यात आली.

दामू शिवाप्पा राठोड (वय 40, रा. बावधन), गणेश सोमू राठोड (वय 36, रा. कैलासनगर, वाकड) आणि अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई राजेश कोकाटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोंडवे कॉर्नर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने या जुगार अड्ड्यावर चपा मारला. त्यात आठ जणांना अटक करून त्यांच्याकडून 23 हजार 60 रुपये रोख रक्कम आणि 50 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 23 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.