Ravet Crime News : किवळेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – कापडाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह किवळे येथे आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पवना नदीच्या परिसरात पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत उघडकीस आली.

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्या व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. मृत रंगाने काळा सावळा असून, अंगात टीशर्ट व काळी पॅन्ट त्याने परिधान केली होती.

रावेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे पवना नदीच्या परिसरात महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत शेतातील एका झाडाला कापडाच्या साह्याने एका 30 ते 35 वर्षे वयाच्या पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आढळून आला.

तेथील खासगी रोपवाटिकाचे चालक प्रसाद धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.