Ravet Crime News : भोंडवे कॉर्नर येथील हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

 अवैधरित्या हुक्का, दारू विक्री करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रावेत येथील भोंडवे कॉर्नर जवळ एका हॉटेलमध्ये पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात अवैधरित्या हुक्का व दारू विक्री करणा-या दोघांवर कारवाई करत हॉटेलमधून हुक्का साहित्य, दारू, पैसे आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख 379 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ढाबा मालक नरेश मारुती भोंडवे (वय 31, रा. रावेत), मॅनेजर शरद यशवंत पाटील (वय 45, रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातील भोंडवे कॉर्नरजवळ असलेल्या गुणाजी व्हेज नॉनव्हेज नावाच्या ढाब्यात अवैधरित्या दारू आणि हुक्का विक्री सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी ढाब्यावर छापा टाकला. त्यात पोलिसांनी 39 हजार 520 रुपये रोख रक्कम, 19 हजार 594 रुपयांच्या देशी, विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या, 13 हजार 265 रुपयांचे चार हुक्का पॉट, हुक्का पिण्याचे इतर साहित्य, 28 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख 379 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.